# उद्धव ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा.

 

मुंबई:  महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली असून रविवारी सायंकाळी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हे मंत्री मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता आणखी एक मंत्री पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या मंत्री महोदयांच्या ड्रायव्हरला आधी कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्या संपर्कात आल्यामुळे मंत्र्यांनाही कोरोनाची बाधा झाली. सध्या या मंत्र्यांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी ठाकरे मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या खासगी स्टाफमधील १४ जणांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आव्हाड बरे झाले असून, सध्या त्यांना डॉक्टरांनी घरीच एक महिना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *