# काळजी करू नका.. धीर धरा… सरकार आपल्या पाठीशी: शरद पवार.

लातूर: लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज रविवारी पाहणी केली. उमरगा तालुक्यातील कवठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका… असा धीर दिला.

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रविवारी दुपारी उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्याशी संवाद सांधला त्यांच्या व्यथा व अडचण समजून घेतली. शेतकऱ्यांनी काळजी करून नये शासन आपल्या सोबत आहे असे सांगून त्यांना धीर दिला.

कवठा येथील भेटीनंतर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या सोबतच औसा तालुक्यातील उजणी येथे भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पाण्यात सडून नुकसान झालेले सोयाबीन तसेच तुरीचे पीक त्यांच्या निर्दशनास आणून दिले. हे नुकसान पाहिल्या नंतर शासनाने यासर्व नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन पालकमंत्री देशमुख यांनी दिले. यावेळी शेतकरी शिष्टमंडळाने दिलेली निवेदने माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्वीकारली.

राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री बसवराज पाटील, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार राहुल मोटे, उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, बसवराज पाटील नागराळकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, किरण रवींद्र गायकवाड, मकरंद सावे, कृषी, महसूल विभागाचे संबंधित अधिकारी सोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *