# शिवसेनेचा दसरा मेळावा; काय म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

हिम्मत असेल तर अंगावर या.. आव्हान द्यायचे आाणि पोलिसांच्या मागे लपायचे.. ईडी. सीबीआयच्या आडून हल्ला केला जातो..

फडणवीसांवर नाव न घेता टिका; केंद्र सरकारवर डागली तोफ, लखीमपूरच्या घटनेवरून संघावरही टिका

सुभाष देसाई, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेते यांची व्यासपीठावर उपस्थिती

..जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो.. विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा..मला कल्पना आहे, बऱ्याच दिवसांनंतर आपल्याला बोलण्याची संधी मिळाली आहे. आपला आवाज दाबण्यास कोणी जन्माला येणार नाही.. शिवसेनाप्रमुखांनी जी परंपरा सुरू केली ती पुढे नेते आहोत. माझ्यासाठी हा दिवस सर्वांचा आशीर्वाद सारखा आहे. मी सर्वांवर फुले उधळली.. तुम्ही माझे सोने आहात. मी मुख्यमंत्री आहे.. असे कधीच वाटू नये.. मी तुमच्या घरातला कोणीतरी आहे. तुमचा भाऊ आहे.. असे वाटायला पाहीजे. काही जणांना अजूनही वाटतेय मी पुन्हा येईल. पुन्हा येईल. बस तिकडेच.. सत्ता येईल. जाईल. अंहपणा डोक्यात जावू नये, असे माझ्या पालकांनी शिकवले…

मी काय बोलणार. कोणाचे वाभाडे काढणार.. माझ्या मनात विषयांची गर्दी झाली आहे… तरी मला हेही माहिती आहे. माझं भाषण झाले की काही जण चिरकण्यास सुरुवात करतील.. त्यांना उत्तर देण्यासाठी, टीकाकारांसाठी बोलत नाही. मी जनता जनादर्शनासाठी बोलत आहे. ठाकरे कुटुंबांना बदनाम करणे हे काहींचे काम झाले आहे… रोजगार हमीचे काम झाले. तुम्ही चिरकत रहा. माझा वाडा चिंरेबंदी आहे. डोकी फुटतील पण माझ्या वाड्याला तडा जाणार नाही.
हर्षवर्धन पाटील अनाहूतपणे बोलून गेले. ते बोलले. अशी माणसांना ब्रँड अंम्बेसिडर केले पाहीजे.. काय लायकीची माणसे आहेत.. अंगावर येण्याची भाषा करतात. लायकी आहे का.. पात्रात आहे का.. अंगावर येण्याची हिम्मत असेल तर अंगावर या.. आव्हान द्यायचे आाणि पोलिसांच्या मागे लपायचे.. ईडी. सीबीआयच्या आडून हल्ला केला जातो..
मुख्यमंत्रीपद तुमच्या नशिबात नव्हते. मी माझ्या पित्याला शब्द दिला म्हणून हे पद स्वीकारले. अजूनही सर्वसामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्रीपद देणारच.. कदाचित त्यांनी शब्द पाळला असता तर मी हे पद घेतले नसते. एक पूत्र म्हणून ही जबाबदारी स्वीकारली. झोळी घेऊन फिरणे वैगरे आमची भाषा नाही.

सकाळी संघाचा मेळावा झाला. मला मोहनजी यांना सांगायचे आहे की आपण हिंदुना जे सांगतो ते ऐकायचे नसेल तर काय उपयोग. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जन्माला येतो. धर्माचा अभिमान पाळला पाहीजे. घराबाहेर पाऊल टाकल्यांनतर देश हा माझा धर्म असला पाहीजे. आम्ही कडवट, राष्ट्राभिमानी असले पाहीजे. हिंदूत्व म्हणजे काय आहे. सर्वांचे पूर्वज एक होते. आहेत. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज परग्रहावरून आले होते. ज्यांना चिरडून मारले ते लखीमपुरचे लोक परग्रहावरून आले होते. हे मोहनजींना पटते आहे का हे..
सध्या जो काय खेळ चालू आहे. व्यसनाधीनता जो प्रकार आहे. सत्तेचे व्यसन हा अंमलीप्रकार आहे. याचा बंदोबस्त कोण करणार..
पुढच्या महिन्यात आपल्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. मी तर आज सांगतो हिम्मत असेल सरकार पाडून दाखवा. छापा-काटा खेळ चालू आहे. छापा टाकला काढला काटा.. हा खेळ जास्त वेळ चालणार नाही.
देशाचे अमृतमहोत्सवी वर्षे आहे. लाल-बाल-पाल.. या प्रमाणे तयारी ठेवावी लागले. हर हर महादेव दिल्लीच्या तख्ताला दाखवावे लागले. शिवसेनेला बदनाम करणारा प्रकार आहे. १९९२-९३ ला शिवसेना नसती तर तुमचे काय झाले असले.. नव हिंदुत्वामुळे हिंदुत्व धोक्यात आहे. सावरकर, गांधीविषयी बोलण्याची आपली लायकी आहे काय… झुंडबळी घेणारे हिंदु नाहीत.. हे कोणी शिकायचे. जेव्हा हिंदुत्वाला धोका होता.. तेव्हा एकच मर्द उभा होता… ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे… कोणामध्ये धमक होती..१९९२-९२ साली दंगली पेटल्या होत्या.. तेव्हा कोण पुढे आले. तेव्हा बिळात लपले होते.. पोलीस आणि लष्कर यांच्या मदतीने मुंबई वाचली नाही तर शिवसेनेमुळे वाचली होती..

तुमची पालखी वाहत नाही. म्हणून त्या शिवसेनेवर आरोप केले जात आहे. मानाची पालखी भारतमातेचे पालखी वाहतो आहे. तुमच्यासाठी नाही तर देव देशासाठी आम्ही आहोत..

हर्षवर्धन पाटील तुमच्या पार्टीत आले पवित्र होतात. पत्नी, मुलावर आरोप केले जातात. नामर्द.. अक्करमाशी.. षंड.. आहात तुम्ही.. तो शिवसैनिक तुमच्या लेखी भष्ट झाला. काटा कसा असतो ते बोचल्यानंतर कळेल. नशिब अजून काटा बोचत नाही. सत्तापिपासून किती..निवडणुका आल्या की उपरे.. उपरे आणून आणून मोठा पक्ष झालेला.. या सर्व गोष्टींचा उबग आलेला आहे.
आपण केलेली कामे हाच आपला वक्ता.. त्यामुळे चित्रफित दाखवली. बरीच कामे केली आहे.. समाजसेवा रक्तात असावी लागते… ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही मदत करतो..

मधल्या काळात राज्यपाल महोदयांनी मला पत्र लिहिले होते..महिलांवरील अत्याचारावर अधिवेशन घेण्याचे सूचविले आहे. मी नम्रपणे त्यांना उत्तर दिले. ती घटना घडली, त्यानंतर नराधमाला अटक केली. दोन दिवसांचे अधिवेशन कशाला.. महिलांवर अत्याचार देशभर वाढतायेत. देशात अशा घटना घडतात. मोदींना सांगून दोन दिवसांचे केंद्रांचे अधिवेशन घेण्याचे सांगितले. पण महाराष्ट्राकडे वेगळ्या नजऱेने पाहिले जाते.. महाराष्ट्राविषयी गळा काढला जातो.. मग उत्तरप्रदेशमध्ये लोकशाहीचा मळा फुललेला आहे.. काहींच्या घरी चोवीस तास शिमगा केला जातो..
महाराष्ट्र सत्तेवर नाही तर सत्याला जागणारा प्रदेश आहे.
माझा देश नेमका चालला कुठे.. यावर्षात अमृतमंथन झाले पाहीजे. काय कमावले काय गमावले हे पाहिले पाहीजे. संघ राज्यावर खुल्या पणाने चर्चा झाली पाहीजे. केंद्र व राज्याचे अधिकारावर चर्चा झाली पाहीजे. राज्यांचे अधिकार काय.. केंद्रा एवढी सर्व राज्य सार्वभौम आहेत आणि राहतील. तीन बाबींत केंद्र हस्तक्षेप करू शकतो.. आणिबाणी, युद्धजन्य परिस्थिती.. गल्ली बोळातून नव्हे तर विचारवंतांचे सल्ले पाहीजे. केंद्राची लुडबूड नको.
सत्तेची चटक वाईट. हे उपटून टाकले पाहीजे. देश आणि राज्य कसे संबंध असायला पाहिजे…
मार्मिकमध्ये त्यावेळी म्हटले होते. वाचा आणि थंड बसा… दुसऱ्या कोणाचा द्वेष करायचा नाही.. शिवसेनेने अंगावर आला तर शिंगावर घेऊ..
केंद्रीय मंत्री सोनवाला यांचा आदेश ७५ टक्के निधी गुजरातकडे वळविला.. संघाशी निगडीत संस्थांना निधी… वाचा आणि थंड बसा… जणू काही संपूर्ण जगात महाराष्ट्रात गांजा, चरस यांचा मोठा व्यापार सुरू आहे काय… तुळशी वृदांवनाऐवजी गांजाची शेती झाली आहे काय.. करोडो रुपयांचा अंमली पदार्थ सापडला.. त्याचे काय.. चिमटभर गांजा हुंगत असताना महाराष्ट्र पोलिसांनी दीडशे कोटींचा गांजा पकडला. केवळ महाराष्ट्रात सर्व काही.. सेलिब्रिटी म्हणून ढोल बडवायचा.. कॅगचे ताशेरे.  गुजरातला ३५० कोटींचा निधी…. वाचा आणि थंड बसा..
महाराष्ट्रात १० हजार कोटी रुपये दिले. ससा आणि कासव.. प्रमाणे माझी मदत असेल.. हे सुरू असताना तिकडे मात्र कोणी ढुंकून पाहत नाही.

केवळ टीका करण्यासाठी मी बोलत नाही. निदान आता तरी सुधरा. आपला देश तरुण देश म्हणून ओळखला जातो. आपला देश युवा शक्तीच्या देश आहे. त्यांच्या हाताला काम द्या.. त्यांना गुन्हेगार ठरवले जात आहे. तरुण गुन्हेगारीकडे का वळतो आहे…मुलगी शिकली प्रगती झाली. नोकरी नसेल. ते हात वेडेवाकडे वागले तर गुन्हेगार आपण आहोत.. वैफल्याशिवाय काय देऊ शकतो.. मुलांना काम पाहीजे. त्याच्या घरातील चूल पेटत नाही… युवा शक्ती महत्वाची आहे. आपण मह्राष्ट्रात उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न करतो. आपण महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच वेळी पोटात दुखतंय म्हणून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.. महाराष्ट्राच्या प्रतिमेवर अँसिड फेकण्याचे प्रकार.. आहे. सत्ता पाहीजे तर घ्या..

महाराष्ट्रात मराठी भाषा भवन उभे करत आहोत. अनेक कामे आपण करत आहोत. मराठी नाटकांचा इतिहास सांगणारे नाट्यगृह करतो.. धारावीत जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र सुरू करत आहोत. मुंबईमध्ये लष्कराचे संग्रहालय करत आहोत.
हिंदुत्वाची शिडी चढून वर चढले आहेत. ते भिंती उभी करून वाद निर्माण करतील. मराठी माणसाची एकजूठ बांधा. मराठी-अमराठी एकजूट असावी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *