शिवसेना दसरा मेळावा: काय म्हणाले उद्धव ठाकरे वाचा सविस्तर
मुंबई: जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो. आपणा सर्वांना दसरा आणि धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा. ते तारीख हे तारीख देतात. देऊद्यात. मी ज्या दिवसापासून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून सरकार पडेल, असा प्रचार केला जात आहे.
एका वेगळ्या परिस्थितीत हा मेळावा होत आहे. मोजक्याच लोकांत हा मेळावा होत आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिला दसरा मेळावा आहे. मला पहिला दसरा मेळावा आठवतो. माझे आजोबा म्हणाले होते की, महाराष्ट्र हा काही लेच्यापेच्याचं राष्ट्र नाही. तोच हा महाराष्ट्र आहे. जो महाराष्ट्राच्या आड येईल, त्याला आडव करून गुढीपाडवा साजरा केला जाईल. हा दसरा मेळावे म्हणजे टार्गटपणा नाही. बिहारमघ्ये कोरोना मुक्त लस देण्याचे बोलले जाते. काही जण बेडूक उड्या मारतात. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारतात. या लोकांचा समाचार घेतला पाहिजे.
मी सहा महिन्यांपासून जनतेशी संवाद साधतो. आज मी मास्क बाजूला ठेवून आपल्याशीच बोलतो आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून भाषण करतो. मी शक्यतो संयमाने बोलणार आहे, टीका, टिपन्नी होतेय. पण शिवसेना गप्प कशी. शिवसेनेचे सैनिक ऐकतात. ते जर शांत राहिले नसते तर काय झाले त्याची कल्पना करा.
ज्याला टक्कर देण्याच्या खुमखुमी असेल त्यांनी आव्हान देऊन पहावे. हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. का तर मंदिरं अद्याप उघडले जात नाहीत. वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर वाघ फटका मारणारच. ज्या वेळी बाबरी पाडली गेली होती तेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न विचारणारे शेपूट घालून बसले होते. मला देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व मान्य नाही. कोरोनात घंटा वाजवून दाखवले. काय मिळालं. आमचं हिंदुत्व असे नाही. माय मरो आणि गाय जगो, असे हिंदुत्व आमचे नाही. गोवंश हत्याबंदी कायदा केला. महाराष्ट्रात कायदा आणि गोव्यात का नाही. हे असे बुसरटलेले हिंदुत्व मान्य नाही.
हिंदूत्व हे आमचे राष्ट्रीयत्व आहे. आज मुद्दाम मी काही कागदं घेऊन आलो आहे. सकाळी संघाचा मेळावा झाला. भागवत यांचे हिंदीतून भाषण झाले. त्यांच्या काळ्या टोपीखाली डोकं आहे का हे पहा. निदान संघचालकांनी सांगितलेले विचार पटते का पहा. डोक्यात मेंदू असेल तर संघचालकांकडून समजून घ्या. आजच भागवत यांनी शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेले हिंदुत्व मांडले आहे. संघाच्या राजकीय शाखांनी विचार करायला हवा, राजकारण्यांनी विवेक पाळा, असे त्यांनी सांगितले.
कशाला सरकार पाडापाडी करतात. उध्दव ठाकरे काय काम करतात ते तुम्हाला दिसेल. आज आम्हाला गर्दी करता आली असती. तुम्हाला जनतेचे महत्व नसेल परंतु आम्ही जनतेची काळजी घेतो. जेवढं लक्ष पक्षाकडे देता तेवढचं लक्ष जनतेकडेही द्या. मदत करतोय. पैसे आणायचे कुठून, ३८ हजार कोटी केंद्राकडे बाकी आहे. बिहारला कोणाच्या खर्चातून फुकट लस देतात. काय म्हणून आम्ही कर्ज घ्यायचे. जीएसटीला त्यावेळेस आम्ही विरोध केला होता. जीएसटी देऊ शकत नसला तर या निमित्ताने जीएसटीच्या कर पद्धत फसली असेल तर त्यांवर पुन्हा चर्चा करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी चूक मान्य करून पुन्हा जुन्या पद्धतीकडे गेले पाहिजेत. हा देश म्हणजे एका पक्षाची मक्तेदारी नाही. हा देश गोरगरिबांचा आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सत्ता मिळवण्याची संधी तुमच्या वृत्तीमुळे गेली.
नितीश कुमार यांना शुभेच्छा देतो. भाजपने हरियाणाच्या कुलदीप विष्णोई मुख्यमंत्री होतील, असे वातावराण तयार केले होते. परंतु त्यांचा पत्ता कट केला. महाराष्ट्रात हाच डाव खेळाल गेला होता. २०१४ साली हाच डाव खेळाल होता. बंददाराआड डाव खेळाल जात आहे. त्यावेळेस शिवसेनेसोबत डाव खेळाला गेला. मी मित्राला कधी दगा दिला आहे. मी केवळ भागवतांच्या भाषणावर बोलतोय. संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमारसोबत तुम्ही युती करतात. हे कसे चालले. नितीश कुमार म्हणाले होते. आम्हाला सेक्युलर पंतप्रधान पाहिजे होते.
निवडणुकांनंतर कोरोनाची लस फुकट देणारे. इतर देशांतील नागरीक काय बांग्लादेशी आहेत काय. त्यांना फुकट आणि इतरांना विकत. लाज वाटली पाहिजे अशा सरकारला.
दानवे तुमचा बाप तिकडे आहे. मला भाडोत्री बापाची गरज नाही. बाप सोडा आहेरचे पाकीटं पळवणारा बाप तुम्हाला लखलभा होवो.
मुंबई पाकव्याप्त काश्मीर म्हटलं आहे. मुंबईत महाराष्ट्रात मीठं खायचं आणि मुंबईची बदनामी करायचे, हे कशासाठी. काश्मीरची एक इंच जाग घेऊन दाखवा
उद्योगांवर कोरोना काळात हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात भूमिपुत्रासाठी येते. हे सर्व भूमिपुत्रांसाठी करत आहेत. जे उद्योगांत माणसं लागतील त्या ठिकाणी मराठी तरुणांनी सहभागी व्हावे. महाराष्ट्र पुढे जात असताना महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. महाराष्ट्र पोलीस निकम्मे आहेत. चरस गांजाची शेती केली जात आहे, अशी बदनामी केली जाती. पोलिसांची मानहानी का सहन करू. मी पोलिसांचा पाईक. तोंडात शेण भरून, गोमुत्राच्या गुळण्या करा. का आमच्या अंगावर येत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न करतात. त्यांना आम्ही जिवंत सोडणार नाही. आम्ही शांत आहेत पण षंड नाहीत. आमच्याशी सभ्यतेशी वागले नाही तर आम्ही कमजोर नाहीत.
भाजपने माती आणि मातेशी इमान राखा. आरेचे जंगल वाचविले. साडेआठशे एकावर जंगल वाचवले. कारशेडवर स्थगित दिली. कांजूरमार्गावर हे शेड नेत आहोत. कारशेड कांजूरमार्ग येथे होणार. पुढे कल्याणपर्यंत जाणार.
विलासी राजा आणि कळसूत्री बाहुल्या. यापुढील काळात कळसूत्रीचा खेळ होणार नाही. जे काही देशात सध्या सुरू आहे. ते विचित्र आहे. केवळ सरकार पाडण्यात भाजपाला रस आहे. ही परिस्थिती अराजकतेकडे जाणारी आहे. तुम्ही लेचेपेचे नाहीत. तुम्ही कोरोनाच्या काळात राजकारण करू नये. सर्व गोष्टी हळुहुळू सुरू होणार आहेत. आज एनडीए अस्तित्वात नाही. शिवसेना गेली. अकाली दल गेले. तुमचा पाया मजबूत करा. आमचे सरकारचे जावू द्या. एकवेळ वेळ येईल. लोकं म्हणतील कोणीही चालवलेले, पण तुम्ही नको.
हे सरकार तुमचे आहे. सर्व समाजाला न्याय देणार. जातीपाती आणि समाजामध्ये महाराष्ट्रपाद्वेष्टे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्या राजकारणाला बळी पडू नका. महाराष्ट्रात फूट पडणार नाही, याची मी ग्वाही देतो.