# नांदेड जिल्ह्यात कटेन्मेंट झोन वगळता शेतीविषयक-बी बियाणे, औषधी दुकाने उघडी ठेवण्यास मुभा.

 

संग्रहित छायाचित्र

नांदेड:  नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यापूर्वी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात अंशत: बदल करुन पुढील तपशिलाप्रमाणे  आस्थापनांना ठरवून दिलेल्या वेळेत व दिवशी चालू ठेवण्यास पुढील आदेशापर्यंत कटेन्मेंट झोन वगळता सामाजिक अंतराचे व नमूद सूचनांचे पालन करण्याचे अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे.

शेतीविषयक-बी, बियाणे, औषधी दुकाने इत्यादींची वार व वेळ पुढीलप्रमाणे:
सोमवार ते शुक्रवार (शनिवार व रविवार वगळून) दुकानाचा प्रकार ॲटोमोबाईल्स, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल्स, टायर्स, बॅटरी, मोबाईल शॉपी, रस्सी, वॉच स्टोअर्स, स्टेशनरी / बुक स्टोअर्स (पुस्तकालय), सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, बिल्डींग मटेरीयल या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत राहील. रविवार वगळून दररोज किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील.
रविवारसह  दररोज शेतीविषयक-बी, बियाणे, औषधे इत्यादींची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत तर हॉस्पिटल, मेडीकल स्टोअर्स सुरु ठेवण्याची वेळ 24 तास दररोज देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *