नांदेड-पनवेल, धर्माबाद- मनमाड, काचीगुडा-नरखेड, काचीगुडा- अकोला या गाड्यांचा समावेश
नांदेड: दक्षिण मध्य रेल्वेने उत्सव काळात प्रवाशांच्या सोयी करिता उत्सव विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. या पैकी काही उत्सव विशेष गाड्यामध्ये प्रवाशी संख्या अत्यंत कमी असल्यामुळे या गाड्या रद्द करण्यात येत आहेत, त्या पुढीलप्रमाणे:
क्र. गाडी संख्या दिवस दिनांक रद्द करण्यात आलेला दिनांक
1) 07614/07613 नांदेड-पनवेल-नांदेड रोज नांदेड येथून 23.10.20 to 29.11.20
पनवेल येथून 24.10.20 to 30.11.20 नांदेड येथून 23.11.20 पासुन रद्द
पनवेल येथून 24.11.20 पासून रद्द
2) 07688/07687
धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस रोज धर्माबाद येथून 24.10.20 to 30.11.20
मनमाड येथून 24.10.20 ते 30.11.20 धर्माबाद येथून 15.11.20 पासून रद्द
मनमाड येथून 15.11.20 पासून रद्द
3) 07641/07642 काचीगुडा–नरखेड-काचीगुडा काचीगुडा येथून -सोमवार वगळता रोज
अकोला येथून- मंगळवार वगळता रोज काचीगुडा येथून 23.10.20 ते 29.11.20
नरखेड येथून 24.10.20 ते 30.11.20 काचीगुडा येथून – 14.11.20 पासून रद्द
नरखेड येथून – 15.11.20. पासून रद्द.
4) 07639/07640
काचीगुडा –अकोला- काचीगुडा काचीगुडा येथून– सोमवारी
अकोला येथून– मंगळवारी काचीगुडा येथून 26.10.20 ते 23.11.20
नरखेड येथून 27.10.20 ते 24.11.20 काचीगुडा येथून 16.11.20 पासून रद्द
अकोला येथून 17.11.20 पासून रद्द.
मुंबई-किनवट- मुंबई विशेष रेल्वेचा विस्तार आदिलाबाद पर्यंत:
प्रवाशांच्या सुविधे करिता मुंबई-किनवट- मुंबई विशेष रेल्वे दिनांक 12 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचा विस्तार आदिलाबाद पर्यंत करण्यात आला आहे. ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील.
१) गाडी संख्या ०११४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते आदिलाबाद- ही गाडी दिनांक १३ नोव्हेंबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी 0४.३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेड, किनवट मार्गे आदिलाबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता पोहोचेल.
२) गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- ही गाडी दिनांक १४ नोव्हेंबर २०२० पासून आदिलाबाद रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी 0१.०० वाजता सुटेल आणि किनवट, हुजूर साहेब नांदेड, औरंगाबाद-मनमाड मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५. ३५ वाजता पोहोचेल.
ही गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा , हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्रकुंड, बोधडी बु., किनवट येथे थांबेल.
या गाडीस एकूण १८ डब्बे असतील. या गाडीत वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल.
ही विशेष गाडी नियमित रेल्वे गाडी सुरु होई पर्यंतच असेल. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.