केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे देशभरातील 121 पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान
नवी दिल्ली: उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 121 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ज्योती लक्ष्मण क्षीरसागर (पोलीस अधीक्षक), शिवाजी पंडितराव पवार, समीर नजीर शेख, किसन भगवान गवळी (सहायक पोलीस आयुक्त), अनिल तुकाराम घेर्डिकर (उप विभागीय पोलीस अधिकारी), नारायण देवदास शिरगावकर (पोलीस उप अधीक्षक), नरेंद्र कृष्णराव हिवारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), राजेंद्र सिद्राम बोकाडे, उत्तम दत्तात्रय सोनावणे, कोंडीराम रघू पोपेरे (पोलीस निरीक्षक) यांचा समावेश आहे.
पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले.
यावर्षी गौरवण्यात आलेल्या पोलिसांमध्ये 15 सीबीआयचे अधिकारी तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांचे प्रत्येकी 15 अधिकारी, उत्तर प्रदेश पोलिसांचे 8, केरळ आणि पश्चिम बंगालचे प्रत्येकी 7 पोलीस अधिकारी आहेत आणि उर्वरित इतर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील अधिकारी आहेत. यात 21 महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
गौरवार्थींची सविस्तर यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/PIB%20Delhi/HM’S%20MEDAL%20FOR%20INVESTIGATION,%202020%20-%20LIST%20OF%20AWARDEES.pdf