बीड: औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक-2020 चे मतदान मंगळवार, 1 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वा. पर्यंत व मतमोजणी गुरवार, 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेची पदवीधर व शिक्षक मतदार संघातील द्विवार्षिक निवडणूक असलेल्या राज्यातील महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना सदर नैमित्तिक सुट्टीबाबत निर्देश दिले आहेत. तरी या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची दिनांक 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा द्यावी, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप आयुक्त सामान्य प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी कळविले आहे.