नांदेड: आज आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिवस दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे.
शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा करू या आणि भारताच्या राष्ट्रीय प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी ठोस पावले उचलूया. नांदेड येथील वन्यजीव छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी खास maharashtratoday.live साठी त्यांच्या संग्रहातील ताडोबा अभयारण्यातील वाघांची छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहेत.