नांदेड : नांदेडच्या हजूरसाहिब रेल्वेस्थानकावरुन आज बुधवारी विशेष श्रमिक रेल्वे उत्तर प्रदेशातील लखनौकडे रवाना झाली. या रेल्वेने सुमारे 1460 मजूर रवाना झाले. रेल्वेस्थानकावर परप्रांतीय कामगारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आरोग्य व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली.
नांदेड स्थानकावरून दुपारी साडेचारच्या सुमारास ही रेल्वे निघाली. या सर्व मजूरांची तपासणी करून गाडीत बसविले. तसेच मजुरांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक सकाळपासून रेल्वे स्टेशनवर तैनात होते. तसेच जेवनाची व्यवस्था सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आली होती.