पुणे: दौंड व पुरंदर तालुक्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्य प्रदेशमधील 1172 मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेद्वारे दौंड रेल्वे स्टेशन येथून आज सायंकाळी 5 वाजता रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
आज एकूण 1172 मजूर व त्यांचे कुटुंब यांना मध्य प्रदेशातील 33 जिल्ह्यांमध्ये पाठवण्याची सोय करण्यात आली. या मजुरांना पाठवताना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून प्राथमिक तपासणी व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून शिस्तबद्धरित्या पाठवण्यात आले. सर्व मजुरांना पाठवण्याचे नियोजन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार व प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय पाटील व सर्व महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन व नगरपालिका यांच्या साहाय्याने पार पडले.