# स्वारातीम विद्यापीठाच्या परीक्षा ३ ते २५ आॅक्टोबर दरम्यान हाेणार.

परीक्षा ६० टक्के आॅनलाईन, ४० टक्के आॅफलाईन -उदय सामंत

नांदेड: सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात, असा निर्णय दिल्याने येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के आॅनलाईन व ४० टक्के आॅफलाईन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सह्याद्री शासकीय विश्रामगृह स्नेहनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, ह्या परीक्षा सर्व १३ अकृषी विद्यापीठात येत्या ३ आक्टोबर ते २५ आॅक्टोबर दरम्यान हाेतील, राज्यातील उर्वरित विद्यापीठात ९० ते ९५ टक्के आॅनलाईन परीक्षा आयोजित केल्या जातील. राज्यात सर्व विद्यापीठांतर्गत ७ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षा देतील तर स्वाराती विद्यापीठात जवळपास ५० हजार विद्यार्थी परिक्षेसाठी बसतील.  आपण राज्यातील सर्व १३ विद्यापीठाला भेटी देऊन अडीअडचणी समजून घेऊन सुसंवाद साधत आहेत, आतापर्यंत ८ विद्यापीठास भेटी दिल्या आहेत विद्यार्थ्यांना विश्वास देण्याचा माझा प्रयत्न आहेे, असे उदय सामंत एका प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले.

यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित हाेते. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी विनाेद रापतवार यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे नियोजन स्वाराती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *