पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या, बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे दहावीच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागली. हा निकाल अखेर बुधवार, 29 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. या परीक्षेसाठी चार हजार ९७९ परीक्षा केंद्र होती.
ऑनलाईन निकालानंतर लगेच दुसर्या दिवसापासून दहावीच्या परीक्षेतील गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी मंडळाच्या
http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळांवर अर्ज करावा. ३० जुलैपासून ८ ऑगस्टपर्यंत छायाप्रतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांवर क्लिक करा:
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com