मुंबई: शून्य उत्सर्जन व पर्यावरण पूरक वाहन निर्मिती क्षेत्रात चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाने आज इंग्लंडच्या कॉसिस इ मोबिलीटी कंपनीसोबत २८२३ कोटी रुपयांचा सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य कराराद्वारे रक्कम २८२३ कोटीची गुंतवणूक प्रस्तावित असून १२५० रोजगार निर्माण होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अनबलगन उपस्थित होते.
कॉसिस समुहाद्वारे पहिल्या टप्प्यात ईव्ही बॅटरीचा पुरवठा करण्यासाठी यूके येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात कारखाना उभारणार आहे. यामुळे राज्यातील विकसित ईको सिस्टीमला चालना मिळेल व मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथील सार्वजनीक वाहतुकीचा २५% वाटा असेल. तळेगाव टप्पा क्रमांक ५ येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारे सुटे भाग या ठिकाणी तयार होणार आहेत. प्रकल्प उभारून राज्यात ईव्ही उत्पादन सक्षम करणे हा आहे. कॉसिस ई-मोबिलिटी इंग्लड येथील कंपनी असून शून्य उत्सर्जन ईव्हीचे उत्पादन व पुरवठा करते.