छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरमधील घटना ताजी असताना शहरापासून जवळच असलेल्या ओहर गावात ३१ मार्च रोजी दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी दगडफेकही झाली आहे. या दगडफेकीत दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावात सीआरपीएफ जवानांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र कोणत्या कारणावरून दगडफेक झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.
ओहर गाव हे छत्रपती संभाजीनगरपासून १० किलोमीटरच्या अंतरावर आहे. अज्ञात कारणावरून राडा झाला असून दगडफेकही झाली. सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच परिसरात शांततापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.