# राज्यपालांचे अधिकार कमी करुन विद्यार्थी केंद्रीत कायदा करावा.

विद्यापीठ कायद्यात सुधारणेसाठी डॉ.सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त  उपसमितीने आज शनिवारी डाॅ.बाआंम विद्यापीठ व स्वारातीम विद्यापीठातील विविध घटकांशी संवाद साधला असता, अधिकार मंडळावरील नामांकने व राजभवनचे अधिकार कमी करुन विद्यार्थी केंद्रीत कायदा करावा, अशा सूचना करण्यात आल्या. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या कामकाजात राज्यपालांचा वाढता हस्तक्षेप व त्यातून निर्माण होणारा अकारण वाद या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे अधिकार कमी करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

औरंगाबाद: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात मोठ्या प्रमाणावर फेरबद्दल करण्याची आवश्यकता आहे. अधिकार मंडळावरील नामांकने व राजभवनचे अधिकार कमी करुन अधिकाधिक विद्यार्थी केंद्रीत कायदा करावा, अशा सूचना विविध घटकातील सदस्यांनी केल्या.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ, कायदा (अधिनियम) २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी गठित डॉ.सुखदेव थोरात समिती सदस्यांनी शनिवार,२३ जानेवारी रोजी विविध घटकांशी संवाद साधला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत ही बैठक झाली. विद्यापीठ नाट्यगृहात या उपसमितीची सभा सकाळी १० ते ६ दरम्यान झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात (माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग) व कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह डॉ.विजय  खोले (माजी कुलगुरु), डॉ. राजन वेळूकर (माजी कुलगुरु), शितल देवरुखकर-सेठ, डॉ.तुकाराम शिवरे आदी सदस्य उपस्थित होते. तर डॉ. नरेंश चंद्रा (माजी प्रकुलगुरु) हे ऑनलाइन सहभागी झाले. प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी उपस्थित होते. शासन निर्णय क्र.साविअ-२०२०/प्र.क्र.३७/विशि ४ दिनांक १९ ऑक्टोबर २०२० अन्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित केली आहे. या समितीच्या ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत विविध उपसमित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा मुल्यांकन समिती या उपसमितीची सभा नाट्यगृह येथे झाली. दिवभराच्या या बैठकीत दोन्ही विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी, अधिकारी, विभागप्रमुख, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, सहसंचालक डॉ.दिगंबर गायकवाड आदी उपस्थित होते.

सकाळच्या सत्रात समितीचे समन्वयक डॉ.विजय खोले यांनी दिवसभरातील विविध सत्रांची माहिती दिली. अध्यक्ष पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात यावेळी म्हणाले, विद्यापीठ कायद्यात सुधारणेसाठी सहा उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे बैठका घेण्यात आल्या. आतापर्यंत शेकडो निवेदने प्राप्त झाली आहेत. देशातील व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा अभ्यास करुन सुधारणा सुचविण्यात येतील, असेही डॉ.थोरात म्हणाले. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले व प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ यांनी सूचना केल्या. दुपारच्या सत्रात मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य शितल देवरुखकर-सेठ यांनी विद्यार्थी केंद्रीत विषय मांडण्याची सूचना केली. दिवसभरात विविध सत्रात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. दिवसभरातील विविध सत्रांचे सूत्रसंचालन संजय शिंदे, डॉ.आनंद वाघ यांनी तर आभार डॉ.पंजाब पडुळ यांनी मानले.

विविध सदस्यांचा सहभाग: दिवभराच्या विविध सत्रात कायद्यात सुधारणेसंबंधी सूचना केल्या. पहिल्या सत्रात सदस्य व कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ यांनी मते मांडली. दुस-या सत्रात उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके, आय.आर. मंझा, डॉ.विष्णू क-हाळे, डॉ.कैलास पाथ्रीकर, भगवान फड यांनी सूचना मांडल्या. तर विभाग प्रमुखातून डॉ.स्मिता अवचार, डॉ.उत्तम अंभोरे, डॉ.संजय मून, डॉ.धर्मराज वीर यांनी सूचना मांडल्या. तर प्राध्यापक गटातून डॉ.विक्रम खिल्लारे, डॉ.शंकर अंभोरे, डॉ.अंबादास कदम, डॉ.विलास खंदारे तर प्राचार्यातून डॉ.किशोर साळवे, डॉ.फारूकी, डॉ .मोरे यांनी मते मांडली.

दुपारच्या सत्रात संस्थाचालक व अधिसभा व व्यवस्थापन परिषद प्रवर्गातून डॉ.राहूल मस्के, संजय निंबाळकर, भाऊसाहेब राजळे, डॉ.राजेश करपे, नरहरी शिवपुरे, डॉ.व्यंकटेश लांब, डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी सूचना केल्या. विद्यार्थी प्रतिनिधी डॉ.उल्हास उढाण, डॉ.तुकाराम सराफ , सचिन निकम, दीक्षा पवार, प्रकाश इंगळे, लोकेश कांबळे, शिरीष कांबळे, गुणरत्न सोनवणे तर शिक्षकेत्तर कर्मचारी गटातून डॉ.कैलास पाथ्रीकर, सतीश दवणे यांनी मनोगत मांडले. सभेसाठी उपकुलसचिव डॉ.प्रताप कलावंत, डॉ.पंजाब पडुळ, भगवान फड, आर.आर. चव्हाण, इंदल जाधव, शहाजी मुदगिरे, अमोल मिसाळ, रणजित तांगडे आदींनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *