# राजस्थानमधील कोटा येथून ७४ विद्यार्थी बसने पोचले पुण्यात.  

 

संग्रहित छायाचित्र

पुणे:  राजस्थानमधील कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले पुण्यात पोहोचल्यावर एकूण ७४ विद्यार्थी आणि ८ ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये  कोरोनाशी संबंधित लक्षणे अथवा आजारी म्हणून  कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनगटावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून घरी पाठवण्यात आले. चौदा दिवसांत आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी धुळे आगाराच्या 70 बस पाठविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ४ बस होत्या. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी  अमृत नाटेकर, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी समन्वय साधून या विद्यार्थ्यांना पुण्यात सुखरूप परत आणले. आज सकाळी धुळे आगाराच्या चारही बस  निर्जंतुकीकरण करून धुळ्याकडे रवाना करण्यात आल्याची माहिती अमृत  नाटेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *