# विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर खालील लिंक वर भरावेत.

मुंबई: सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्यण विभाग यांच्यावतीने महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमाशी संलग्‍न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात. सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर नवीन व नुतणीकरण योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत 3 डिसेंबर 2020 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणाली पोर्टलवर
https//mahadbtmahait.gov.in या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी डीबीटी पोर्टलव्दारे पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यवर शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क इतर अनुज्ञेय शुल्क त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट वितरीत केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्नीत करुन घेणे आवश्यक आहे.

सर्व संस्थाच्या महाविद्यालयासाठी प्राचार्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल 3 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे.
https//mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील. महाडीबीटी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयांनी अर्ज भरावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *