पर्यावरण रक्षणाबरोबरच वृक्ष लागवड करून जोपासली जैवविविधता
लातूर: देवणी चे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी कार्यालयाच्या आवारात विविध प्रकारची फळझाडे व फुलांची झाडे अशी सुमारे 62 प्रकारच्या वृक्षांची लागवड करून वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचिती आणून दिली आहे. व पर्यावरण रक्षणाबरोबरच वृक्ष लागवड करून आपल्या प्रशासकीय सेवेबरोबरच वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे. जागतिक जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने त्यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
देवणी तहसील कार्यालयाची सुमारे 5 एकर जागा आहे. या जागेत तहसीलदार घोळवे यांनी जलसंधारणाची विविध कामे केली. तसेच नैसर्गिक रित्या आलेली विविध प्रकारची झाडे जोपासणे व नवीन रोपांची लागवड केली आहे. यामध्ये खालील प्रकारची फळझाडे व फुलझाडे लावण्यात आली आहेत.
- आंबा, 2. सीताफळ, 3. रामफळ, 4. पेरू, 5. अंजीर, 6. जांभूळ, 7. आवळा, 8. कवठ, 9.चिंच, 10. बोर, 11. कडुलिंब, 12. बाभुळ, 13. करंज, 14. आपटा, 15.पळस, 16. सुबाभूळ, 17. ऑस्ट्रेलियन सांभाळ, 18. इंग्रजी चिंच, 19. कढीपत्ता, 20. बेल, 21. नांदुरकी, 22. वड, 23. पिंपळ, 24. मोगरा, 25. पारिजातक, 26.तुळस, 27.स्वस्तिक, 28. जास्वंद, 29. गुलाब, 30. नारळ, 31. सुरू, 32. सायकस, 33. मोरपंखी, 34. जूनिपर, 35. ख्रिसमस ट्री, 36 लिटल पाम, 37. नागपर्णी, 38.शेवंती, 39.झेंडु, 40. कर्दळी, 41. लिली, 42. लिंबू, 43. फणस, 44. चिकू, 45. चाफा, 46. अशोक, 47. सोनचाफा, 48. बदाम, 49. सप्तपर्णी, 50. सदाफुली, 51. निशीगंध, 52. हिरवा चाफा, 53. कोरफड, 54. काजू 55. डाळिंब 56. कांचन 57. शिसव 58. साग 59. शामल 60. कण्हेरी 61.लाल चाफा व 62. फुलांची विविध झाडे इत्यादी रोपांची लागवड करून जैवविविधता (Biodiversity) जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.