# पदवीधर निवडणूक मतदानामुळे 10 वी, 12 वी परीक्षा केंद्रात तात्पुरता बदल.

बीड: पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेच्या केंद्रामध्ये निवडणूक मतदानामुळे एक दिवसाचा बदल झाला आहे. यासंदर्भात सर्व संबधितांनी नोंद घ्यावी,

दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजीच्या मतदानामुळे खालीलप्रमाणे परीक्षा केंद्रातील बदल पुढील प्रमाणे:

1)भगवान विद्यालय, बीड केंद्र क्रमांक २००३ (इ,. १०वी.) ऐवजी भा.वा. सानप प्राथमिक विद्यालय, धानोरा रोड, बीड. (भगवान विद्यालय, धानोरा रोड बीड समोर)

2)चंपावती विद्यालय, बीड केंद्र क्रमांक २००० (इ,. १०वी.) ऐवजी चंपावती इंग्लिश स्कूल, बीड (चंपावती विद्यालय, बीड शेजारी)

3)बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केंद्र क्रमांक २०९ (इ,. १२वी.) ऐवजी मिल्लिया कन्या शाळा, किल्ला मैदान, बीड (बलभीम महाविद्यालय शेजारी)

4)श्री सिध्देश्‍वर विद्यालय, माजलगाव केंद्र क्रमांक २५०२ (इ,. १०वी.) ऐवजी सिध्देश्‍वर महाविद्यालय, माजलगाव (श्री सिध्देश्‍वर विद्यालय शेजारी)

5)न्यू हायस्कूल थर्मल, परळी वै केंद्र क्रमांक २१४६ (इ,. १०वी.) ऐवजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय, परळी ( न्यू हायस्कूल शेजारी)

6) जि.प. मा.शाळा शिरूर कासार केंद्र क्रमांक २६२५ (इ,. १०वी.) ऐवजी जि.प. कन्या शाळा, शिरूर (का.) (जि.प. मा.शाळा शेजारी)

या बदला नुसार आणि बदल झाल्याप्रमाणे तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षार्थींनी हा बदल केवळ दहावीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग-1 आणि बारावीच्या गणित व संख्याशास्त्र भाग-2 या पेपर पुरताच आहे, याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *