# राज्याच्या सर्वच भागात थंडी वाढली; परभणीत सर्वात कमी तापमान 9.9.

पुणे: उत्तर भारताकडून राज्याकडे वाहत असलेल्या थंड वा-यामुळे राज्यात थंडी वाढू लागली असून, बुधवारी राज्याच्या सर्वच भागात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात आणखी थंडी वाढणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिमालयाच्या पायथ्याशी दोन दिवसांपूर्वी पश्चिमी चक्रावात धडकला होता. यामुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला होता. सध्या या चक्रावाताचा प्रभाव कमी झाला असला तरी 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान आणखी एक पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. यामुळे उत्तर भारतात थंडी वाढणार  आहे. यामुळे राज्याच्या सर्वच भागात थंडीचा कडाका जोरादार वाढेल. याबरोबरच पूर्वेकडून अचानक थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे देखील राज्यात थंडी वाढलेली आहे.

राज्यात बुधवारी  मध्यमहाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा 7.5 अंश एवढा खाली घसरला आहे. विशेषत: विदर्भ व  मराठवाड्यात थंडीचे प्रमाण जास्त आहे.  कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग  या जिल्ह्याचेही किमान तापमान घसरण झाली आहे.

राज्यात बुधवारी सायंकाळी नोंदलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे: पुणे -10.6, लोहगाव- 12.4, जळगाव- 11.6, कोल्हापूर-13.2, महाबळेश्वर- 12.2, मालेगाव- 12.6, नाशिक- 10.6, सांगली- 13.3, सातारा- 12.6, सोलापूर- 12.9, मुंबई- 22.0, रत्नागिरी- 17.3, डहाणू- 19.3, औरंगाबाद-12, परभणी-9.9, नांदेड- 13.5, बीड- 15.6, अकोला-12.4, अमरावती- 12.7, बुलढाणा-13.2, ब्रम्हपुरी- 14.5, चंद्रपूर-11.8, गोंदिया-11.4, नागपूर- 12.2, वर्धा -13.0.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *