# भीमा खो-यातील धरणे 58 टक्के भरली; मागील वर्षी याच दिवसात पाणीसाठा 97.24 टक्के.

पुणे: भीमा खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या  खो-यातील सर्व धरणात मिळून शुक्रवारपर्यंत 57.91 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच दिवसात धरणांमध्ये 97.24 टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, पाऊस पडण्याचे प्रमाण असेच राहिले तर ऑगस्ट अखेरपर्यंत धरणे पूर्ण क्षमतेने भरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षी  जून महिन्यात भीमा खो-यामध्ये पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा सरासरीपेक्षा खाली गेला होता. मात्र, जुलै महिन्यात या खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. परिणामी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सर्व धरणांमध्ये 97.24 टक्के एवढा पाणीसाठा झाला होता. त्या तुलनेत यावर्षी जून आणि जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस पडला. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर वाढू लागला. 10 ऑगस्टनंतर त्यामध्ये आणखी वाढ झाली. धरणांच्या पाणीसाठ्यात जोरदार वाढ होऊ लागली असली तरी अजुनही बहुतांशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे त्या-त्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात तुरळक प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे.

ऑगस्ट अखेर धरण साठ्यात वाढ:
गतवर्षी जुलै महिन्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. त्यामुळे धरणे लवकर भरली. मात्र, यावर्षी मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राहिल्यास धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ होईल, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

भीमा खो-यातील धरणे आणि पाणीसाठा (टक्केवारीमध्ये):
धरणाचे नाव    —  पाणीसाठा
1)पिंपळगाव जोगे — 0.00
2)माणिकडोह —     23.27
3)येडगाव   —     42.31
4) वडज —     66.01
5)डिंभे —       57.31
6)घोड —        48.46
7) विसापूर —   24.37
8)कळमोडी —  100
9)चासकमान — 44.41
10)आमा आसखेड—  61.42
11)वडिवळे —  80.98
12)आंद्रा —  93.45
13)पवना —    58.84
14)कासारसाई —   95.77
15)मुळशी —   78.15
16) टेमघर —  52.20
17) वरसगाव — 66.79
18)पानशेत — 80.80
19)खडकवासला—100
20)गुंजवणी— 95.81
21)निरा-देवघर —66.07
22) भाटघर — 78.91
23) वीर —  98.93
24)नाझरे —  66.80
25)उजनी —  32.29
26) चिल्हेवाडी —  75.84.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *