मुंबई: महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लिपिक गट क‘ कर्मचाऱ्यांची तांत्रिक लिपिक ऐवजी ‘महसूल सहायक‘ असे पदनाम करावे अशी मागणी होती. राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे. कर्मचाऱ्यांच्या पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करूया:
गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा. कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात ‘मिशन बिगिन अगेन‘ करण्यात आले असले तरी आपण सगळ्यांनी यापुढील काळातही काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, यावर्षी आपण आपल्या सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करूया. जगावर आलेले हे संकट टळूदे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे, अशी प्रार्थनाही गणरायाला आपण सर्वांनी करूया, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.