# सध्यातरी मास्कपासून सुटका नाही; पुढील वर्षातही मास्क घालावा लागेल.

नवी दिल्ली: गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे प्रत्येकाचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि हात स्वच्छ धुणे या गोष्टीं सातत्याने पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टी आपल्या जीवनाचा एक भाग बनल्या आहेत. कोरोनावरील लस घेऊन लोक स्वतःचे रक्षण करत आहेत. मात्र, लसीकरणानंतरही संसर्ग रोखण्यासाठी सर्व गोष्टी पाळण्याचा सल्ला तज्ज्ञांमार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे मास्कपासून सुटका कधी असा प्रश्न लोकांकडून वारंवार विचारला जात आहे. लोकांना मास्कशिवाय ते कधी फिरू शकतील हे जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, आता नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, सध्यातरी मास्कपासून सुटका नाही, पुढील वर्षातही मास्क घालावा लागेल.

व्ही. के. पॉल यांच्या मते, कोरोनावर मात करण्यासाठी लस, औषध आणि कोरोना निर्बंधाचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. जर कोरोनाचा पराभव करायचा असेल तर या सर्व गोष्टी एकत्र पाळाव्या लागतील, त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत भारतातील लोकांना मास्कचा वापर करावा लागेल. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पॉल यांनी इशारा दिला आहे आणि म्हटले आहे की तिसऱ्या लाटेची शक्यता अद्याप टळली नाही, पुढील काळ धोकादायक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *