राज्यात 23, 24 मे असे दोन दिवस पावसाचे; औरंगाबाद, जालना, बीडसह पश्चिम महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’
पुणे: मान्सून येत्या 24 तासात अंदमानासह बंगालच्या उपसागरात दाखल होणार आहे. मान्सून दाखल होण्यास सध्या या भागात अनुकूल स्थिती तयार झाली आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले कमी दाबाचे पट्टे या दोन्ही भागात तयार होत आहेत. त्यामुळे मान्सून केरळच्या दिशेने वेळेआधीच पोहचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मध्यपूर्व अरबी समुद्रपार करून मध्यप्रदेशपर्यंत (पश्चिम मध्यप्रदेश, उत्तर मध्यमहाराष्ट्र, दक्षिण कोकण) कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याच्या प्रभावामुळे 23 आणि 24 मे रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या उत्तर अंदमान आणि मध्यपूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा 22 मे रोजी तयार होणार आहे. 24 मे रोजी या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार असून, हे चक्रीवादळ 26 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. या शिवाय मध्यपूर्व अरबी समुद्रपार करून मध्यप्रदेशपर्यंत (पश्चिम मध्यप्रदेश, उत्तर मध्यमहाराष्ट्र, दक्षिण कोकण) कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय मध्य प्रदेशाच्या उत्तरपूर्व भागापासून ते दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे मान्सून 24 तासात अंदमान आणि बंगालच्या उपसागरात पोहचणार आहे.
राज्याच्या काही भागात ‘यलो अलर्ट’
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड या भागात 23 आणि 24 मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. तर या जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.