पुणे: राज्यातील पाऊस आता पूर्णपणे ओसरला असला तरी काही भागात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, दोन दिवसांपासून राज्यातील पाऊस कमी झाला होता. सध्या मात्र, पाऊस ओसरला असला तरी मध्यमहाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी दिवसभर कडक उन पडले होते. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस पूर्णपणे थांबला आहे. दरम्यान, शहराचे कमाल तापमान 29.7 तर किमान 20.6 अंश सेल्सिसची नोंद झाली आहे. शहरात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार, मध्यम त्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. दिवसभर पाऊस पडत असल्यामुळे शहरातील वातावरण विस्कळीत झाले होते. आता मात्र पाऊस थांबला असून, कडक उन पडत आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 31ऑगस्टपर्यत शहर परिसरात हलका पाऊस पडेल. तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.