विधानसभा अध्यक्षांचे सुप्रीम कोर्टाने कान उपटले; विधानसभा अध्यक्षांबद्दल आज नेमकं काय म्हणालं सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: विधानसभा अध्यक्षांचे सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी दरम्यान कान उपटले. विधानसभा अध्यक्षांबद्दल आज नेमकं काय काय म्हणालं सुप्रीम कोर्ट..

मिस्टर एसजी ( सॉलिसिटर जनरल जे अध्यक्षांचे वकील आहेत) कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना नीट समजावून सांगितलं पाहिजे

सुप्रीम कोर्टाच्या निकालाची ते अशी अवहेलना करु शकत नाहीत.

मागच्या वेळी आम्हाला वाटलं की ते विवेकानं वागतील

वेळापत्रक म्हणजे सुनावणी लांबणीवर टाकण्याचं कारण बनता कामा नये

हे प्रकरण गांभीर्यानं घेतोय असं त्यांच्या कृतीतून दिसलं पाहिजे

जूनपासून या प्रकरणात कुठलीच हालचाल झालेली नाहीय

ही सुनावणी म्हणजे एक निव्वळ फार्स बनता कामा नये, त्यांनी नीट सुनावणी केली पाहिजे

आम्ही स्वत: हे वेळापत्रक निश्चित केलं नाही कारण त्यांचं पद हे विधीमंडळ संस्थेचं एक घटनात्मक पद आहे. पण जर हे काम ते नीट करत नसतील तर त्यांना जबाबदार धरावं लागेल

आम्ही व्यवस्थेच्या सर्व अंगाचा आदरच करतो. पण या कोर्टाच्या आदेशाची जर कुणी अवमानना करत असेल तर आम्हाला त्यांचे कान ओढावेच लागतील.

निर्णय हा निवडणुकीआधी झालाच पाहिजे. हे असं वेळ काढत प्रकरण निष्प्रभ करणं चालणार नाही.

मि. सॉलिसिटर तुम्ही अध्यक्षांना आता मंगळवारी एक वेळापत्रक घेऊन यायला सांगा..विषय कोर्टाच्या निकालाच्या सन्मानाचा आहे, ज्याची आम्हाला चिंता वाटतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *