# अंबाजोगाई शहरालगतची मोरेवाडी, चनई, जोगाईवाडी व शेपवाडी ही गावे दहा दिवस संपूर्ण बंद.

बीड: अंबाजोगाई शहरालगत असलेले ग्रामपंचायत मोरेवाडी, चनई, जोगाईवाडी व शेपवाडी ही गावे १० दिवसांकरिता ११ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेपासून २१ ऑगस्ट 2020 पर्यंत सर्व दृष्टीने बंद करण्यात येत आहेत. अंबाजोगाई शहरातील लॉकडाऊनबाबत कालच्या आदेशातील सर्व प्रतिबंध या गावांना लागू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये म्हणून अंबाजोगाई शहर 10 दिवसांकरिता पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. परंतु ग्रामपंचायत मोरेवाडी, चनई, जोगाईवाडी, शेपवाडी ही गांवे अंबाजोगाई शहरालगत असल्याने तेथील नागरिक अंबाजोगाई शहरात कोणत्याही कामासाठी सारखे येत असल्याने व शहरालगतच्या वरील गांवात कोरोनाबाधित रुग्ण निघत असल्याने या गावातही लॉकडाऊन करणे गरजेचे आहे, असे तहसीलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंबाजोगाई व गटविकास अधिकारी प.स.अंबाजोगाई यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *