… तर देशातील सगळ्याच राज्यात अस्थिरता निर्माण होईल!

छत्रपती संभाजीनगर: संविधानाला तिलांजली देण्याचं काम सध्या सुरू आहे. म्हणून आम्ही संविधानापुढं नतमस्तक झालो. राज्यातील घटनेनुसार सत्तेवर आलेलं सरकार पाडून घटना पायदळू तुडवून राज्यात सरकार आलंय. हे असंच चालू राहिलं तर देशातील सगळ्याच राज्यात अस्थिरता निर्माण होईल व अशा घटनांमुळं प्रशासनही चांगलं काम करणार नाही, असं मत माजी उपमुख्यमंत्री तथा ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

रविवार, २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगही दबावाखाली निर्णय देत आहे, आता सुप्रिम कोर्ट न्याय देईल, यात शंका नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाला यंदा ७५ वर्षे होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी या मुक्तीसंग्रामाची उपेक्षा केली असून यासाठी केवळ १२ मिनीटे वेळ दिला. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री स्वत:ला म्हणवून घेता अन् मराठवाड्याचा अपमान करता, असेही अजित पवार म्हणाले.

तत्कालिन राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तेव्हा का नाही काढली यात्रा. तेव्हा का राज्यपालांना थांबवता आलं नाही, सुप्रिम कोर्टाचा हवाला देत हे सरकार नंपुसक असल्याचे सांगून हे सरकार दुटप्पी राजकारण करत आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा, यात्रा कसल्या काढताय बेरोजगारी, महागाई यावरून लक्ष वळवण्यासाठीच या यात्रा व दंगली घडवून आणल्या जात असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *