सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम ही तीन विमानतळे सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली.
मेसर्स अदानी एन्टरप्रायजेस लिमिटेडला क्रियान्वयन, व्यवस्थापन आणि विकासासाठी एएआय ची जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम ही तीन विमानतळे पन्नास वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या प्रकल्पांमुळे सार्वजनिक क्षेत्रात आवश्यक गुंतवणूकीसोबतच सेवा वितरण, कौशल्य, उपक्रम आणि व्यावसायिकतेमध्ये कार्यक्षमता येईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.