नांदेड: प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वे डिसेंबर माहिन्यात हुजूर साहिब नांदेड– श्रीगंगानगर-हुजूर साहिब नांदेड दरम्यान दोन विशेष गाड्या आणि सिकंदराबाद-जयपूर-सिकंदराबाद दरम्यान एक गाडी अशा तीन विशेष गाड्या सुरु करत आहे.
या तीनही विशेष रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या वेळा पुढीलप्रमाणे:
१)गाडी संख्या ०२४३९ हु. सा. नांदेड ते श्रीगंगानगर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २७ डिसेंबर २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान दर रविवारी सकाळी ११.०५ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडा, हनुमानगढ मार्गे रात्री 08.15 वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल.
२)गाडी संख्या ०२४४० श्रीगंगानगर ते हु. सा. नांदेड साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २५ डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान दर शुक्रवारी दुपारी 0१.२५ वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि हनुमानगढ, भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे रात्री 09.40 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.
३)गाडी संख्या ०२४८५ हु. सा. नांदेड ते श्रीगंगानगर विशेष द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २४ डिसेंबर २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११.०५ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडा मार्गे सायंकाळी 07.00 वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल.
४)गाडी संख्या ०२४८६ श्रीगंगानगर ते हु. सा. नांदेड द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २२ डिसेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ दरम्यान दर मंगळवार आणि शनिवारी दुपारी 02.45 वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे रात्री 09.40 वाजता नांदेड येथे पोहोचेल
५)गाडी संख्या ०९७१४ सिकंदराबाद ते जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ डिसेंबर २०२० ते ०१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी सिकंदराबाद येथून रात्री 09.40 वाजता सुटेल आणि नांदेड, हिंगोली, अकोला, भोपाल, उज्जैन, कोटा मार्गे जयपूर येथे सकाळी ०६.४५ वाजता पोहोचेल.
६)गाडी संख्या ०९७१३ जयपूर ते सिकंदराबाद साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २६ डिसेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ दरम्यान दर शनिवारी जयपूर येथून रात्री 10.35 वाजता सुटेल आणि कोटा, उज्जैन, भोपाल, अकोला, हिंगोली, नांदेड मार्गे सिकंदराबाद येथे सकाळी ०६.५० वाजता पोहोचेल.
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.