अंबाजोगाई: तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोरगरीब, दीनदलित यांचे कैवारी बीडचे माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृति दिनानिमित्त आज गुरूवार, 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता फेसबुक लाईव्ह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे फेसबुक लाइव्ह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.डॉ.अशोक ढवळे असणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे, “शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे आणि आपण”. याबरोबरच दुसरे व्याख्याते म्हणून सीटू या कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय, “कामगार कायद्यातील बदल नेमके कोणासाठी असणार” हा आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना अॅड.अजय बुरांडे, डाॅ.महारूद्र डाके करणार आहे. आपण फेसबुक लाईव्ह व्याख्यानामध्ये सहभागी व्हावेच व इतरांनाही या व्याख्यानांमध्ये शेअर करून सहभागी होण्यास सांगावे, असे आवाहन कॉ.गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्य कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.