बीड: बीड जिल्हा रूग्णालयातील परिचारिकेसह जिल्ह्यात मागील 24 तासांत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर बीड शहरातील 16 जणांसह जिल्ह्यात एकूण 26 जणांची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा रूग्णालयातील 40 वर्षीय परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बीड येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने ते व्हेंटिलेटरवर होते. तशाच अवस्थेत त्यांना बीड येथे आणले असता त्यांचाही मृत्यू झाला. बीड शहरासह जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. बीड शहरात 16. परळीत 5, गेवराईत 3 तर अंबाजोगाई व आष्टीत प्रत्येकी 1 अशा एकूण 26 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.