# नांदेड येथून मुंबई, पुणे साठी दोन विशेष गाड्या.

नांदेड: प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे आणखी दोन विशेष गाड्या चालवत आहे. या दोन्ही  रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत.  अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.

या गाडीच्या वेळा पुढीलप्रमाणे:
1.गाडी संख्या 07618 नांदेड ते मुंबई विशेष  एक्स्प्रेस 26 जानेवारी, 2021 पासून पुढील आदेश मिळे पर्यंत हुजूर साहिब नांदेड येथून सकाळी 10.05 वाजता सुटून परभणी, औरंगाबाद, मनमाड, मार्गे मुंबई सी.एस.एम.टी. येथे रात्री 21.55 वाजता   पोहोचेल.

2.गाडी संख्या 07617 मुंबई ते नांदेड विशेष  एक्स्प्रेस 27 जानेवारी पासून पुढील आदेश मिळे पर्यंत मुंबई सी.एस.एम.टी. येथून सकाळी 06.15 वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे हु. सा. नांदेड येथे सायंकाळी 18.00 वाजता नांदेड येथे पोहोचेल. या गाडीस 18 डब्बे असतील.

3.गाडी संख्या 02730 नांदेड ते पुणे विशेष  एक्स्प्रेस 26 जानेवारी  पासून पुढील आदेश मिळे पर्यंत नांदेड येथून रात्री 21.30 वाजता सुटून  परभणी, औरंगाबाद, मनमाड, मार्गे पुणे येथे सकाळी 09.40 वाजता पोहोचेल.

4.गाडी संख्या 02729  पुणे ते हुजूर साहेब नांदेड  विशेष एक्स्प्रेस दिनांक 27 जानेवारी, 2021  पासून पुढील आदेश मिळे पर्यंत पुणे येथून रात्री 22.00 वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे नांदेड येथे सकाळी 10.00 वाजता  पोहोचेल.  या गाडीस 17 डब्बे असतील.

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड 19 संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *