# कामगार चळवळीतील लढाऊ नेते काॅ.ऊध्दव भवलकर यांचे निधन.

औरंगाबाद: सीटूचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि कामगार चळवळीतील लढाऊ नेते काॅम्रेड ऊध्दव भवलकर यांचे आज कोरोनामुळे निधन झाले.

औरंगाबाद जिल्ह्यात, मराठवाड्यात सीटू संघटना मजबूत करण्यासाठी व कामगार चळवळ धारदार बनवण्यासाठी काॅम्रेड भवलकर यांचे योगदान लक्षणीय होते. ते लढाऊ कामगार नेते होते. शेतकरी- कामगार- शेतमजूर यांची एकजूट झाली पाहिजे यावर त्यांचा भर होता.  त्यांच्या निधनाने सीटू, कामगार चळवळ व डाव्या चळवळीची हानी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *