# विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर करणार -उदय सामंत.

संग्रहित छायाचित्र

मुंबई: कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षांचा मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र, येत्या २ ते ३ दिवसात राज्यातील परीक्षा बाबतचे वेळापत्रक जाहीर केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) नेमलेल्या दोन समितींने याबाबत काही शिफारसी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महाविद्यालयीन, विद्यापीठाचे नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करावे अशी शिफारस करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिलेल्या गाईडलाइन्स या राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्याप्रमाणे एफवाय आणि एसवायच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै दरम्यान घेण्यात याव्यात. शिवाय १२ वी निकाल लागल्यानंतर प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन १ सप्टेंबरपर्यंत पुढील शैक्षणिक वर्ष सुरू कराव्यात, अशा सूचना त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानुसार आता उद्या आणि परवा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक आणि राज्यातील विद्यापीठाचे कुलगुरू या गाईडलाइन्स नुसार राज्यातील विद्यापीठासाठीचे अंतिम वेळापत्रक २ ते ३ दिवसात ठरवतील, असं उदय सामंत यांनी सांगितले. हे वेळापत्रक मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या निदर्शनास आणून पुढील २ ते ३ दिवसात राज्यातील परीक्षाबाबतचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सामंत म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *