महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती
मुंबई: बोलत बोलत एक वर्ष निघून गेले. अनेक संकटं आली. त्या संकटावर मात करून जगन्नाथाचा रथ पुढे नेण्याची कामगिरी केली. त्याचे दर्शन या पुस्तिकेच्या माध्यमातून करण्यात आले. गेल्या पन्नास वर्षात मी असे कधी पाहिले नाही. एका वर्षात सरकार स्थापन झाले आणि त्याची चिकित्सा करण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून आले. काही शंका निर्माण झाली. कधी नव्हे ते सरकार हातून गेल्यामुळे अस्वस्थता दिसून आली, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपावर नाव न घेता केली.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रम व सरकारची कामगिरी, निर्णयाची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’, या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उद्योग मंत्री सुभाष देसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार आदींची उपस्थिती होती.
शरद पवार पुढे म्हणाले, संकटाची मालिका सुरूच होती. या सरकारमधील प्रत्येक प्रतिनिधींनी समर्थपणे जबाबदारी हाताळली. शेतकरी आठ दहा दिवसांपासून रस्त्यावर उपोषणाला बसला आहे. राज्यकर्त्यांनी त्यांच्या प्रश्नांला हवे ते महत्व दिले नाही. राजधानीत हे चित्र आहे. जिथे संकटाची मालिका होती. त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सर्व संकटाचा सामना केला. हा राज्य सरकारने चमत्कार केला आहे. महाराष्ट्र उद्योगधंद्याचे राज्य आहे. उद्योगाचे महत्वाचे राज्य बंद झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेकडे विपरित परिणाम होणार, याची काळजी राष्ट्रप्रमुखांना होती. परंतु कारखाने कशी चालू राहतील. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात मागे राहिले नाही. कारखानी चालली. उद्योग थांबले नाहीत. सर्वांनी कष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व केले. यांत लोकांचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेने हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी हातभर लागला. आज या सरकारमध्ये जे काम करत आहेत. अनेक सहकारी नव्या उमेदीचे आहेत. अनेक सहकारी अनेक वर्षे सत्तेत गाढा प्रशासनाची अनुभव असलेली लोकल आहे. या दोघांचे समन्वयाने सरकार यशस्वी होईल.
स्थानिक निवडणुकांमध्ये सर्व ठिकाणी महाविकास आघाडीला लोकांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. विविध पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्राला हा फारसा अनुभव नाही. वेगवेगळ्या पक्षाचे सरकार तीनदा आले. शंकरराव चव्हाण आणि मी अनुभवी होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. उद्धव ठाकरे सरकारकडे लोक उत्सुकतेने पाहत होते. मुख्यमंत्री अनुभवी असले तरी कमी नाहीत. जनतेने जबाबदारी टाकल्यांनतर पाच पंचवीस वर्षे महाराष्ट्राचा गाढा पुढे न्यायचा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेः अजूनही विश्वास बसत नाही. प्रत्यक्षात पॅव्हेलियनमध्ये बसून क्रिकेट पाहणे आणि मैदानात उतरून टोलेबाजी करणे सोपे नाही. अनेकजण गृहित धरून चालत होते. शिवसेना फरफटणारा पक्ष नाही. तिन्ही पक्ष आणि अपक्ष नेते. सर्वांना संघर्षाचा अनुभव आहे. संघर्ष केल्यानंतर आपण काय कमावतो हे एक वर्षांत आपण पाहिले आहे.
पवार साहेब सतत काम करत असतात. तुमच्या कारकिर्दीत पुस्तक यायला पाहिजे. नव्या पिढीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. सोनियांशी फोनवर बोलत असतात. कॉँग्रेसचे लोक सहकार्य करतात. राष्ट्रवादीचेही चांगले सहकार्य करतात. हे चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. कॅबिनेट माहित नव्हते. तेव्हा जुनी जाणती मंडळी यांनी मला पहिल्या दिवसांपासून सहकार्य करत आहेत. अनुभव नव्हता. तो येतोय. वर्ष कठिण आहे. नैसर्गिक आपत्तीप्रवण ठिक आहे. त्यात राजकारण केले जाते. ते क्लेषकारक आहे. आतासुद्धा आपण संपूर्ण महाराष्ट्र सुरू केला आहे. पाश्चिमात्य देशात दुसरी लाट आली आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे. आम्ही केवळ समुद्रकिनारी हवा खात रहायचे. तीन चाकाचे सरकार. चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे. जनतेने हे सरकार स्वीकारले आहे. जगन्नाथाचा रथ आपण पुढे नेत आहोत. एक वर्षांचा काळ मोठा आहे. तीन वेगवेळ्या विचारायचे सरकार असताना आपण कोरोनामध्ये कुठही लपंडाव केला नाही. या संकटातून आपल्याला बाहेर पडायचेय.
माझ्यावरती टीका होते. मी घराबाहेर पडत नाही. मला टॅपिंगवर विश्वास नाही. महाराष्ट्र कधी घाबरला नाही. घाबरणार नाही. जर कोणी आमच्यावर राजकीय संकट आणण्याचा प्रयत्न करत असेल तरी आम्ही डगमगणार नाही. सरकार कसे चालले पाहिजे, हे मलपृष्टावर पाहून कळते. गाडगेमहाराजांच्या दहासुत्रीनुसार हे काम सरकार करते. मुख्यमंत्री झालो म्हणून सिंग फुटली काय. उद्धव सदैव नम्र राहा. माझे पाय जमिनीवर आहेत. सरकारचे पाय जमिनीवर आहेत. यापुढेही मजबूत पाय टाकत राहू. जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही.
उद्योग मंत्री सुभाष देसाई: २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर शपथविधी झाला. वर्षपूर्ती सोहळा त्याच ठिकाणी झाला असता. परंतु कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ अशी अनेक संकटं आली, परंतु हे सरकार थबकले नाही. सर्व संकटाचा मुकाबला करत शेती सावरली, अडचणीतील लोकांना मदत केली. हा महाराष्ट्र थांबला नाही. त्याला उपमुख्यमंत्री आणि थोरात यांच्यासह सर्व नेते लढत होते. उद्योग व्यापाराला चालना दिली. गृहनिर्माणसाठी भक्कम निर्णय घेतले. पर्यावरणाच्या रक्षणाकडे या सरकारने सातत्याने लक्ष दिले. आरेमधील ८०८ हेक्टर क्षेत्र राखीव ठेवले. पर्यटनावर उद्योगांचा दर्जा दिला. महाजॉब पोर्टल अनेक उपक्रम राबवून आपल्याकडील बेरोजगार कमी करण्यासाठी प्रयत्न केले. हे सरकार पुढे निघाले आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी साथ मार्गदर्शन मिळाले ते शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात: हे सरकार स्थापन करणे ऐतिहासिक घटना आहे. तीन पुस्तकं आली. चौथं काढावे लागले. उद्धव ठाकरेंच्या नेत्वृत्वाखाली आपण वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केला. कोरोनाच्या संकटात आपण त्याचा मुकाबला केला ते वाखणण्याजोगे आहे. संकट संपले नसले तर त्याला योग्य रितीने सामोरे गेले. शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज माफ केले. दुधाचा प्रश्न सोडविला. दहा लाख लिटर दूध खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याची भूमिका घेतली. अतिवृष्टी असेल. कोकणातील चक्रीवादळ असो आपण सर्वांना मदत केली. जीवितहानी टाळली. विदर्भातील महापुराच्या संकटात आपण खंबीरपणाने उभे राहिलो. दहा हजार कोटींचे ऐतिहासिक पॅकेज दिले. या कार्यकाळात संकटाचा सामना करत आपण पुढे जात आहोत. भावनिक न होता आपण वाटचाल करत आहोत.
उपमुख्यमंत्री अजित पवार: सुभाषराव देसाई यांनी प्रास्ताविकाला सांगितलेली गोष्ट खरी आहे. सर्व जण बाहेर असल्यामुळे ३ डिसेंबर ही तारीख ठरवण्यात आली. वर्षपूर्तीनिमित्त नागरिकांचे जनतेचे आभार मानतो. सर्वांना शुभेच्छा देतो. हे सरकार राज्यातील जनतेच्या हितासाठी बांधील आहे. वर्षांपूर्वी जे घडले त्याचा उल्लेख बाळासाहेब आणि सुभाषराव देसाई यांनी केला. महाराष्ट्र थांबणार नाही, थांबलेला नाही. एक चांगली पुस्तिका काढण्याचा प्रयत्न केला आहे, पहिल्या वर्षांची कामगिरी, निर्णयाची माहिती या पुस्तिकेतून दिली आहे. मुखपृष्ठाला एक वर्षे महाविकास आघाडीचे.. या निमित्ताने सरकारचे काम मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. अडचणी खूप आल्या. ज्यावेळी पहिला अर्थसंकल्प सादर केला. साडेचार लाख कोटींचा अर्थसंकल्प देण्याच्या प्रयत्न केला. सातत्याने दोन लाखापुढे कर्ज असणाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या प्रमुखांनी वेळोवेळी सांगितले आहे. कालच्या ३० नोव्हेंबरपर्यंत २८ हजार कोटी येणे बाकी आहे. दीड लाख कोटी पगार आणि पेन्शनमुळे सर्व गणित बिघडले. सर्व गणित तीन लाखांपर्यंत बजेट आले आहे. कोरोनामुळे डगमगले नाही. वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या. सरकार पडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात त्यांना यश आले नाही. सरकारचे भविष्य काय असे मला विचारण्यात आले. कुणी काहीही करा या सरकारला काहीही अडचण येणार नाही. शाळा सुरू झालेल्या नाहीत. एसटीचा प्रश्न पुढे आला. अचडण असली तर कुठल्याही विभागाला कमतरता पडू दिली नाही.
सरकारची जनतेबद्दलची संवेदनशिलता, लोकांपर्यंतची बांधिलकी कायम ठेवली जाईल.
मुख्यमंत्री, राजेश टोपे डॉक्टर झाले आहेत. त्यांना कोरोना अद्याप भिऊन आहे. सर्वांना सोबत घेऊन समर्थपणे पुढे जाण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प आहे. वेगवेगळ्या विचारधारेचे सरकार असले तरी समान विकास कार्यक्रमावर समान धागा मजबूत आहे, तोपर्यंत या सरकाला धोका नाही. सातत्याने लोकहिताचे निर्णय आपण घेतले आहेत. काही प्रश्न राहिले असून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहकाऱ्यांना ताकद मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्य सरकारची वर्षपूर्ती साजरी. महाराष्ट्राच्या प्रगतीची पुनर्रआखणी करण्यासाठी आतापासूनच कामाला लागले पाहिजे. विधानपरिषदेच्या सहा जागा आपण लढविल्या. पाचही जागेवर आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. निकाला लागायला वेळ आहे. परंतु चांगला पायंडा पडल्याचं दिसत आहे. १२ उमेदवारांची नावे राज्यपाल महोदय कोश्यारी साहेबांनी जाहीर करावीत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.