औरंगाबाद: शहरातील क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तिायज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक निमित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनावरणानंतर भव्य रोषणाई आणि आतिषबाजी करण्यात आली. देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतऱ्याचे व परिसराचे सौदर्यींकरण महानगरपालिकेने पूर्ण केले आहे.
क्रांती चौक येथील छत्रपती शिवजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याविषयी माहिती
• पुतळ्याची उंची : 21 फुट
• पुतळ्याचे वजन : 7 मेट्रीक टन
• पुतळ्यासाठी वापरण्यात आलेला धातु : ब्रांझ धातु (Gun Metal)
• पुतळ्याच्या चौथाऱ्याची उंची : 31 फुट
• चौथाऱ्यास पुतळ्याची एकूण उंची : 52 फुट
• चौथाऱ्याचे बांधकाम आर.सी.सी.मध्ये असून चौथाऱ्या भोवती स्टोन क्लॅडींग• चौथाऱ्याभोवतीच्या 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती बसविण्यात आलेल्या आहेत.
• चौथाऱ्या भोवतीच्या कांरजे (Cascade Fountain) तयार करण्यात आलेले आहे. तसेच हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृष्य पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
• अश्वारुढ पुतळा तयार करणे रक्कम रु.: 98.00 लक्ष
• चौथऱ्यांचे बांधकाम करणे रक्कम रु : 255.00 लक्ष
• एकूण अंदाजपत्रकिय रक्कम रु: 353.00 लक्ष
• पुतळा शिल्पकार : मे.चित्रकल्प, धायरी,पुणे (प्रो.दिपक थोपटे)
• वास्तुविशारद : धीरज देशमुख, औरंगाबाद
• आर.सी.सी.कन्सटल्टंट : रविंद्र बनसोडे, स्ट्रक्चरल, इंजिनिअर, औरंगाबाद.