# नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉझिटिव्ह.

मुंबई: शिवसेना नेते तथा राज्य मंत्रिमंडळातील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्री.शिंदे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती त्यांनी स्वतः ट्विटद्वारे दिली आहे.

काल मी माझी कोविड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राज्यातील मंत्र्यांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र काही थांबत नाही. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *