पुणे: सावली संस्थेच्या मतीमंद आणि विशेष मुलांचे लसीकरण सोमवार, २४ मे रोजी सावली संस्थेत पार पडले. बुद्धी असून शारीरिक परावलंबत्व आणि न बोलता येणाऱ्या या मुलांसाठी लसीकरण ही एक वेगळीच गोष्ट होती.
सेरेब्रल पाल्सी, आत्ममग्न आणि बहुविकलांग मुलांना लस देणे, हे खूप जिकिरीचे काम असल्याचं डॉ.संपदा यांनी सांगितलं. तर आमच्यासाठी हा क्षण खूप महत्वाचा असल्याचं नर्स सविता पवार आणि राणी कांबळे यांनी सांगितलं. सर्वसामान्य माणूस आणि विशेष मुले यांमधला फरक ही लस देताना जाणवल्याचं सावलीचे प्रमुख वसंत ठकार यांनी सांगितलं. प्रत्येक मुलाचे मानसिक आणि शारीरिक प्रश्न वेगळे असून त्यांचे लसीकरण करणे ही काळाची गरज आहे. जेणेकरुन भविष्यात या मुलांना कोरोनाची लागण होऊ नये आणि उर्वरित आयुष्य सुखाचे होवो, हा यामागचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी सावली मतीमंद आणि बहुविकलांग प्रतिष्ठानच्या 91755 18196 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.