छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड हे शुक्रवारी (दि.4) जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुका शासकीय दौर्यावर येत आहेत. या दौर्यादरम्यान महसूल सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता अंबड येथे आगमन झाल्यानंतर श्री. आर्दड हे मत्स्योदरी देवीचे दर्शन घेऊन दौर्याची सुरूवात करणार आहेत. 10.45 वाजता घनसावंगी तहसील कार्यालयात भेट, दुपारी 2 वाजता तिर्थपुरी येथील शिवतिर्थ मंगल कार्यालयात महसूल सप्ताह अंतर्गत जनसंवाद कार्यक्रम तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वाटप त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. याशिवाय गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करणे, शेतकरी आत्महत्या अनुदान, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अनुदान, स्मशानभूमी आदेश वाटप (देवनगर, क्रांतीनगर), शिधापत्रिका वाटप, बीएलओ / विद्यार्थी नवीन मतदार यादी नोंदणी, इतर विभाग लाभार्थी वाटप (कृषी, पंचायत समिती, नगर पंचायत ) आदी कार्यक्रमांचा यात समावेश राहणार आहे. दुपारी 2 वाजता महसूल सप्ताह अंतर्गत खापरदेव हिवरा ते भार्डी शिवरस्ता लोकसहभागातून तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ देखील त्यांच्या हस्ते होणार आहे.
याशिवाय ई-पीक पहाणी प्रात्यक्षिक देखील त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर घनसावंगी येथील शासकिय विश्रामगृहावर राखीव वेळ राहणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे.