# विक्रेत्यांना हातगाडीवर घरोघरी जाऊन मातीचे बैल, गणेश मूर्ती विकण्यास परवानगी.

तत्पूर्वी विक्रेत्यांना अँटिजन तपासणी करून घेणे सक्तीचे

बीड: जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून, या कालावधीत मूर्ती घडवणारे आणि मूर्ती विक्रेते यांना फिरत्या गाड्यावर घरोघरी जाऊन मातीचे तयार केलेले बैल, गणेश मूर्ती विकण्यासाठी लॉकडाऊन कालावधीमध्ये 22 ऑगस्ट पर्यंत सूट देण्यात येत आहे.

दरम्यान, बीड, गेवराई, शिरूर कासार, आष्टी, पाटोदा, माजलगाव, धारूर, वडवणी, केज, अंबाजोगाई, परळी या शहरातील अशा विक्रेत्यांनी आपापल्या शहरातील शासकीय रुग्णालयात सोमवार, 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3.00 वाजता स्वतःची अँटिजन तपासणी करून घ्यावी, असे आदेश प्रवीण धरमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी दिले आहेत.

ज्या विक्रेत्यांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी अँटिजन तपासणी करणे शक्य होणार नाही त्यांनी मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 रोजीही अँटिजन तपासणी करून घ्यावी. सर्व विक्रेत्यांनी अँटिजन तपासणीसाठी जाताना स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. सर्व नागरिकांनी अशा विक्रेत्यांची अँटिजन तपासणी झाली असल्याबाबत खात्री करूनच बैल किंवा श्री गणेश मूर्ती खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *