‘वेरुळ – अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव’ 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान*

‘पूर्वरंग ‘ मध्ये शनिवारी सिद्धार्थ उद्यानात गायन मैफल

औरंगाबाद:  औरंगाबादच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान असणारा ‘वेरुळ – अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव’ 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान सोनेरी महल येथे होणार आहे. तीन दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे कला, वादन, गायनाची, कथ्थकची सुरेख मैफल असणार आहे. या महोत्सवाची वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि नागरिकांना विविध कला प्रकारांचा अनुभव घेता यावा यासाठी ‘पूर्वरंग’ ह्या कार्यक्रमाची संकल्पना राबविण्यात येत आहे.

‘जागर इतिहासाचा लोककलेचा आणि संस्कृतीचा’ या  अंतर्गत 18 फेब्रुवारी 2023 रोजी सिद्धार्थ उद्यानात सायं ७ वाजता पं. विश्वनाथ दाशरथे यांचे उपशास्त्रीय गायन तर राहुल खरे यांचे भावगीत व भक्तीगीत रसिकांना ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला आमदार प्रदीप जैस्वाल, मानसिंग पवार, डॉ. छाया महाजन, डॉ.  भवान महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या उपक्रमामुळे महोत्सवाचे वातावरण निर्माण हाऊन स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असल्याने नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.

*वेरूळ अजिंठा महोत्सवाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ*:

वेरूळ अजिंठा महोत्सव २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम कलाकार सहभागी होत आहेत. शुक्रवारपासून महोत्सवाच्या तिकीट विक्रीस प्रारंभ झाला. पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी जिल्हाधिकारी आणि महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते तिकीट विकत घेऊन विक्रीचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अतिरिक्त आयुक्त श्री. नेमाने  यांची प्रमुख उपस्थिती होती.

येत्या २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान सोनेरी महालात वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिग्गज कलाकरांना ऐकणे बघणे सर्वसामान्यांना परवडेल या दृष्टीने आयोजन समितीने तिकीट दर ठेवले असून ६००, ३०० आणि १५० रुपये असा पूर्ण सिझन (तीन दिवस)चा तिकीट दर आहे. यासाठी शहरात पाच ठिकाणी विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सेतू केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय, एमटीडीसी स्टेशन रोड, संत एकनाथ रंगमंदिर, तापडिया नाट्य मंदिर, कवड्रांगल कनॉट प्लेस या ठिकाणी हे तिकीट उपलब्ध असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *