नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद येथील जिल्हा रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणाऱ्या एका ४६ वर्षीय व्यक्तीचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. महिपाल सिंग असे या व्यक्तीचे नाव असून शनिवारी कोरोनाची लस घेतल्यापासूनच त्याला अस्वस्थ वाटत होते. महिपालचा मृत्यू कोरोना लस घेतल्यामुळे झाला, असा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
गेल्या वर्षी कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं होतं. आजही देश काही प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी भारतासोबतच अनेक राष्ट्रांमध्ये लसीकरण मोहिमेस सुरवात झाली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे लस घेणाऱ्या नागरिकांना लसीमुळे साईड इफेक्ट झाल्याचे देखील समोर येत आहे. मोरादाबाद येथे जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका 46 वर्षीय वॉर्डबॉय महिपालने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा दिवशी मृत्यू झाला. नाईट ड्युटी संपल्यानंतर त्यांना छातीत दुखणे, श्वास घेण्यात त्रास होणे त्याचबरोबर कफचा त्रास जाणवू लागला. प्रकृती बिघडल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.