पुणे: चक्रीवादळाचा फटका मुंबईसह कोकण विभागाला बसणार असला तरी त्याचा परिणाम मराठवाड्यातही जाणवणार आहे. यंदा मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यातच अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या अनेक वर्षात जूनच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यत अतिवृष्टी होणार आहे. यात औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद या आठही जिल्ह्यात सलग दोन दिवस ३ व ४ जून रोजी अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला आहे.
या चक्रीवादळाचा फटका कोकणात बसणार त्यामुळे त्याचा प्रभाव दहा किमी परिसरात राहणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा,
सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातही अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
खुप छान