मुंबई: मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे व बीड जिल्ह्यातील जाळपोळ प्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल झाल्याने मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. शहाणे असाल, तर मराठ्यांवर गुन्हे दाखल करू नका. गुन्हे मागे घ्यावेत. गुन्हे दाखल झाल्याने सरकारविरूद्ध रोष निर्माण होत आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले.
सरकार ६ कोटी मराठ्यांवर गुन्हे दाखल करणार आहे का? गुन्हे दाखल केल्यानं लोकांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण होत आहे. अधिकाऱ्यांनी विनाकारण त्रास दिला, तर न्यायालयामार्फत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. गुन्ह्यांच्या भीतीमुळे आरक्षणाच्या लढ्यापासून मागे हटायचं नाही. हे खोटे गुन्हे आहेत,” असा आरोप जरांगे-पाटलांनी केला.
न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नाही. पुरावे असूनही सरकार मराठ्यांना जाणुनबुजून आरक्षण देत नाही. काही जातींना पुरावे नसताना आरक्षण दिलं. आपल्याला कठोर लढाई लढावी लागणार आहे. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार राहिल,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.