महिला दिन विशेष: कौटुंबिक जबबाबदाऱ्या सांभाळून पत्रकारिता करणार्‍या अरुणा होकर्णे

स्त्री म्हणून जन्माला येनं आणि त्या आयुष्याला समृद्धीच्या शिखरावर पोचवण, जितक कौशल्याचं काम तेवढं जिकिरीचं ही ! आपल्या कौटुंबिक जबबाबदाऱ्या सांभाळून एका ठराविक आयुष्याच्या परिघाच्या बाहेर पडून आपली खरी ओळख जगणाऱ्या स्त्रिया कमीच ! वास्तवाला ओळखून त्यापुढे जाऊन नवी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रिया जेव्हा आकाशाला गवसणी घालू लागतात परंपरेने चालत आलेले पायंडे फिके पडत, एका नव्या स्त्री शक्तीची करुणा, क्षमता आणि साहस अशी नाविन्यपूर्ण ओळख जगाला होऊ लागते. अरुणा होकर्णे या मध्यमवर्गीय कुटुंबातील कुटुंबवत्सल स्त्री विजय होकर्णे आणि होकर्णे बंधू त्यांचे फोटोग्राफी क्षेत्रातील योगदान महत्वाचे आहे. कार्यक्षेत्र नांदेड असले तरी हिंगोली या आपल्या गावाशी या कुटुंबाची नाळ अजूनही जुडलेली. अरुणा होकर्णे या हिंगोली जिल्ह्यासाठी दूरदर्शन प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं कौतुक यासाठी की आपली कुटुंबाची काळजी घेत असतानाच आपल्या गावाविषयी त्यांची ओढ विलक्षण ! आपल्या जिल्ह्याची ओळख जगाला व्हावी, या जिल्ह्याने घेतलेली गरुडझेप सर्वाना कळावी, या अनुषंगाने त्यांनी दूरदर्शन प्रतिनिधी म्हणून सूत्रे स्वीकारली.

चित्रीकरणाच्या अनुषंगाने पत्रकारितेचा असलेला वारसा त्या चालवत आहेत. संवेदनशील व्यक्ती असेल तर सामाजिक स्तरावर कार्य करताना लोकमानसाच्या व्यथांची जाण सहज होते. सामाजिक, शैक्षणिक, शेती, यासारख्या क्षेत्रात होणारे सकारत्मक बदल टिपण्याची क्षमता निर्माण होते. हिंगोली त्या मानाने दुर्गम जिल्हा. पण शेती व्यवसायाने या जिल्ह्याला मिळालेली ओळख महत्वाची. त्या योगे अनेक क्षेत्रांशी येणारा परस्पर संबंध आणि काळानुरूप झालेले बदल टिपण्यासाठी अरुणा होकर्णे सदैव आघाडीवर असतात.

एखाद्या समाजोपयोगी घटनेचे वास्तववादी चित्रण करणे तसे मोठे कार्य. योजनांच्या मुळा पर्यंत जाऊन त्याचा वृत्तांत लिहिणे, ते योग्य वेळेत प्रसारित होणे, महत्वाचे असते. अरुणा होकर्णे हिंगोली जिल्ह्यासाठी दूरदर्शन प्रतिनिधी म्हणून कार्य पाहणाऱ्या पहिल्या महिला प्रतिनिधी आहेत. आपल्या सहकाऱ्यांसह कॅमेरा, गाडी, प्रवास करीत वार्तांकन करणे सोपे नाही. पण अरुणा होकर्णे यांनी ते कार्य लिलया पेललेले आहे. हिंगोली जिल्हा निर्मितीला बराच काळ लोटलेला असला तरीही त्यात अमूलाग्र बदल नेहमीच जाणवत असतात. हिंगोली जिल्ह्यात होणारे शासकीय योजनांचे योग्य नियोजन, त्या बद्दलची माहिती आपल्या बातम्यांद्वारे प्रसारित करण्यात दूरदर्शन सह्याद्री वाहिनी अग्रेसर आहे. दूरदर्शन बरोबर कार्य करीत असताना शासनाच्या भरिव कामगिरीला जनमाणसांपर्यंत पोचविण्याचे कार्य  अरुणा होकर्णे यांनी केले आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात राबविले जाणारे सौर ऊर्जेचे प्रकल्प, रस्ते विकास, कृषी, ग्रामीण भागात वापरले जाणारे गॅस, त्या अनुषंगाने पर्यावरण क्षेत्रात होत असलेले बदल, स्थलांतरित पक्षांच्या नोंदी टिपणे आणि त्याबाबत जनमानसात त्या कार्याबद्द्दल आस्था वाढविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. स्त्रियांच्या विविध स्तरावरील प्रश्न, राजकीय घटना, तसेच कोरोना काळातील वार्तांकन हा विषय त्यांनी जबाबदारीने हाताळला. कोरोना काळातील जोखमीचे काम असताना शासनाच्या विविध कार्याची दाखल घेत सरकारच्या कार्याची माहिती जनमाणसांपर्यंत पोचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे .
 
महिला दूरचित्रवाणी प्रतिनिधी म्हणून वावरताना विविध अडचणींवर मात करत बातमीचा वेध साधने ही एक साधनाच ! एखाद्या घटनेचे चित्रीकरणासह वास्तववादी वृत्तांकन करण्यासाठी कमालीचा अभ्यास असणे गरजेचे असते. एखादी बातमी स्क्रिनवर काही मिनिटांसाठी झळकते पण त्यासाठी खूप परिश्रम घेतलेले असतात. आणि बातम्या ह्या विविधांगी असतात आणि त्या विषयीचे सखोल ज्ञान असणे गरजेचे असते. ते अरुणा होकर्णे यांनी साध्य केले आहे. यात यत्किंचित्तही शंका नाही.  अरुणा होकर्णे यांचे कार्य मोलाचे यासाठी आहे की, महिला दूरदर्शन प्रतिनिधी म्हणून त्या प्रेरणास्रोत आहेत. एखाद्या घटनेचे वास्तववादी चित्रण असो की निवडणूकपूर्व लोकांच्या प्रतिक्रिया टिपणे असो. त्या कायम त्यासाठी सज्ज असतात. लोकांपर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मोलाचे आहे. पडद्याआड राहून काही व्यक्ती आपले कार्य चोखपणे बजावत असतात, कोणत्याही प्रसिद्धीपासून दार राहत आपल्या कार्याशी एकनिष्ठ असं महत्वाचे असते.
    
आपण जे कार्य करतो ते चोखपणे बजावणे यासाठी आयुष्याला वाहून घ्यावे लागते. प्रत्यक्ष  कार्य महत्वाचे असते स्त्री म्हणून आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या जिल्ह्याची नवी ओळख जनमानसात आपण कायम निर्विवादपणे पोहोचवत आला आहात. २०१२ सालापासून  आपण शासनाच्या सकारत्मक प्रतिमा निर्मितीसाठी हिंगोली जिल्ह्यात केलेले कार्य उल्लेखनीय आहेच. या सोबतच विविध बातम्यांचा/ घटना घडामोडींचा घेतलेला वेध काही शब्दात टिपण आवडघडच !  आपल्या विश्वासपूर्ण कार्यातून आम्हाला दिसून आलेली सचोटी, बातमीचा वेध घेण्याचा हातखंडा, आपण दूरचित्रवाणी करिता एक तपाहून अधिक घेतलेले श्रम शब्दातीत आहेत! नारीशक्ती म्हणून माध्यम क्षेत्रात सहनशीलता, क्षमता आणि साहस याची नाविन्यपूर्ण ओळख करुन देणाऱ्या अरुणा होकर्णे यांचे महिला दिनानिमित्त अभिनंदन..!
-डॉ. प्रेमेंद्र बोथरा, हिंगोली
मोबाईल: 9422178321

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *