पुणे: विदर्भात हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. या भागातील सर्वच जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात पाऊस पडणार आहे. दरम्यान, मराठवाड्यातील तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता असली तरी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर मध्यमहाराष्ट्र आणि कोकणात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. आता विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अकोला, तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागात हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेत पाऊस पडणार आहे.