झाला हनीमून झालं लग्न
दिल्ली वारीत दोघेही मग्न
दोघांच्याच गुलूगुलू गुजगोष्टी
तरीही काहीच होईना
विस्ताराचा पाळणा काही हलेना..
विस्ताराला मुहूर्त मिळेना
भटजीही झाले सैरभैर
त्यांनाही काही कळेना..
लग्न तर दिले लावून
तरीही सूत जुळेना
चोरून भेटण्याची
लग्नाआधीची
मज्जा आता येईना..
मध्यस्थ झाली ईडी
घालून कानात बीडी
हाती काही लागेना
वऱ्हाडी झाली खुळी..
-विलास संतराम इंगळे