औरंगाबाद: कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वरिष्ठ राज्य उपाध्यक्षपदी सुमित भुईगळ यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी निवडीचे आदेश काढले आहेत. संघटनेतील मागील 20 वर्षाच्या कार्याची दखल घेऊन ही राज्य कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे.
भुईगळ यांनी अधिकारी/ कर्मचारी यांच्या प्रश्नावर वेळोवेळी प्रशासनाशी लढा देऊन न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भूमी अभिलेख, वनविभाग, जिल्हा परिषद, आय.टी.आय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, दंत महाविद्यालय व रुग्णालय, जलसंपदा विभाग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक व रुग्णालय औरंगाबाद, ग्रामसेवक, जलसंपदा, मजीप्रा, राज्य पुरातत्व विभागासह अनेक खात्यातील कास्ट्राईबच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून स्वागत केले व आनंद व्यक्त केला.